Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्ह्णून ओखली जाते. या भूमीला अनेक संतांची शिकवण लाभली आहे. या सर्व संतान पैकी एक संत तुकडोजी महाराज. त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली होती. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक सामाजिक कार्य केली. तसेच तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म १९०९ मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली नावाच्या गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथे व बारखेडा येथे झाले. तुकडोजी महाराजांचे नाव तुकडोजी आहे कारण त्यांनी त्यांचे बालपण भजन गाताना मिळालेल्या दानावर व्यतीत केले. त्यांचे नाव त्यांचे गुरू अडकोजी महाराजांनी दिले होते. ते स्वतःला 'तुकड्यादास' म्हणायचे. तसेच तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोठा यज्ञ केला होता. त्यामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे समाधी मंदिर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोजारी येथे आहे. तुकडोजी महाराजांनी सदैव जनसेवा केली. यामुळे त्यांना "राष्ट्रीय संत" म्हणून ओळखले जाते. तुकडोजी महाराज नेहमी मंदिरात जाऊन गीते गायचे. त्यांची गाणे ऐकून लोक अगदी मंत्रमुग्ध व्हायचे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी ते आपल्या गावी परत आले. तसेच संत तुकडोजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा उपदेश केला. एवढेच नाही तर 1955 मध्ये त्यांनी जपानसारख्या देशात जाऊन सर्वांना विश्व बंधुतेचा संदेश दिला.
संत तुकडोजी महाराजांची देशभक्ती आणि त्यांनी केलेली रचना यामुळे गांधीजींनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते. त्यांनी अमरावतीच्या आसपास अनेक मंदिरांचे निर्माण केले. त्यांचा उद्देश नेहमी सामाजिक कार्य आणि मानवसेवा करणे होता. संत तुकडोजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा उपदेश केला. एवढेच नाही तर 1955 मध्ये त्यांनी जपानसारख्या देशात जाऊन सर्वांना विश्व बंधुतेचा संदेश दिला. 1956 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिली संत संघटना स्थापन केली. शेवटच्या काळापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजाडी भजनातून आपल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रप्रबोधन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे १४ ऑक्टोबर १९६८ मध्ये कर्करोगाने निधन झाले.
तसेच जिथे त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस घालवले तिथेच त्यांची समाधी मंदिर बांधण्यात आले. तुकडोजी महाराजांचे समाधी मंदिर सुंदर बांधले असून अनेक लोक याठिकाणी भेट देतात. तसेच महाराजांची समाधी अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावात आहे.