Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सद्गुरु शंकर महाराज पुणे

Shankar Maharaj Pune
, शनिवार, 18 जानेवारी 2025 (07:30 IST)
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र भूमी ही अनेक संतांचे पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली आहे. अनेक संतांचे मार्गदर्शन या भूमीला लाभलेले आहे. त्यापैकी एक महान संत शंकर महाराज होय. तसेच सिगारेटचा नैवेद्य दाखवले जाणारे मंदिर म्हणजे पुण्यातील शंकर महाराजांचा मठ होय. कारण महाराजांना सिगारेट ओढायला आवडायची. याकरिता आज देखील भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेने सिगारेट अर्पण करतात. श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे नाथ सिद्धांच्या परंपरेतील एक परिपूर्ण गुरु होते आणि आधुनिक युगातील महान योगी संतांपैकी एक होते. तसेच शंकर महाराजांचा जन्म 1800 च्या सुमारास मंगळवेढा येथे उपासनी नावाच्या कुटुंबात झाला.  

Shankar Maharaj Pune
शंकर महाराज जीवन इतिहास-
महाराज दिसायला शारीरिकदृष्ट्या विकृत होते म्हणजेच पौराणिक काळात त्याचे वर्णन अष्टावक्र  म्हणजे आठ ठिकाणी वाकलेला आणि महान ज्ञानी पुरुष असे केले जाते. त्यांची उंची कमी होती. पण त्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब होते. तसेच त्यांचे डोळे मोठे आणि तेजस्वी होते. त्यांचे अनेक फोटो आणि छायाचित्रे पुण्यातील समाधी मंदिरात पाहता येतात, ज्यामध्ये ते वेगवेगळ्या पोशाखांमध्ये दाखवले आहे. महाराज उंचीने लहान आणि कृश असले तरी ते खूप शक्तिशाली होते आणि गर्विष्ठ व्यक्तीचा अहंकार चिरडून टाकण्यासाठी त्यांनी आपली शक्ती दाखवल्याची अनेक उदाहरणे आहे. महाराज एकाच ठिकाणी जास्त काळ राहिले नाहीत. ते एका शहरातून दुसऱ्या शहरात जात राहिले. तसेच त्यांना सिगारेट ओढण्याची आवड होती. विशेष म्हणजे महाराजांना त्यांच्या बाह्य स्वरूपांच्या पलीकडे पाहू शकणारेच त्यांच्याकडे येऊ शकत होते. तसेच शंकर महाराजांना अंगठ्या आणि दागिने घालण्याची आवड होती, पण ते त्या इतरांना देत असत. तसेच महाराजांनीच एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो! नावही ‘शंकर’. महाराज खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावे. तसेच श्री शंकर महाराजांना एक नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. ते अनेक नावांनी वावरत. सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर, देवियाबाबा, रहिमबाबा, टोबो, नूर महंमदखान, लहरीबाबा, गुरुदेव अशा नावानीही त्यांना ओळखले जातं. नावाप्रमाणेच त्यांचे रूपही अनेक, काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. तसेच त्यांची गुडघे वर करुन बसण्याची विशेष पद्धत होती. खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते अशात ते कधी एका स्थानी थांबत नसत. त्रिवेणी संगम, अक्कलकोट, नाशिक, त्र्यंबकेश्र्वर, नगर, पुणे, औदुंबर, तुळजापूर, सोलापूर, हैद्राबाद, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची.
ALSO READ: शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे
श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका.त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते. तसेच भक्तांना ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.

श्री सद्गुरु शंकर महाराज पुणे जावे कसे?
श्री सद्गुरु शंकर महाराज मठ पुणे येथे सहज पोहचता येते. पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून अनेक शहरांना जोडलेले आहे. पुणे शहरात आल्यानंतर तुम्ही खासगी वाहन, कॅब किंवा बसच्या मदतीने धनकवडी मध्ये असलेल्या शंकर महाराजांच्या मठात सहज पोहचू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंगा पंडालमध्ये गायक शंकर महादेवन यांनी "चलो कुंभ चले" गाण्याने सर्वांना केले मंत्रमुग्ध