Marathi Biodata Maker

तारकर्ली बीच : हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा

Webdunia
विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. 

बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. 

निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतावतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. 

जाण्याचा मार्ग : 
मालवणपासून तारकर्ली केवळ सहा किलोमीटर आहे. पुणे, कोल्हापूर, मालवण येथून बसची व्यवस्था आहे. मुंबईपासून साडेपाचशे तर कोल्हापूरपासून हे ठिकाण दीडशे किलोमीटरवर आहे.तारकार्लीसाठी जवळचे रेल्वे स्टेशन आहे 

कुडाळ. तेथून येथे येण्यासाठी बस उपलब्ध असतात. तारकर्लीला विमानाने जाण्यासाठी गोव्यातील डाबोलीम हे जवळचे विमानतळ आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मीच्या चित्रपटाच्या सेटवर गोंधळ; हरिद्वार या धार्मिक शहरात 'बार' असा फलक लावल्याने लोक संतप्त

गायक गुरु रंधावाच्या जिमबाहेर अंधाधुंद गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

सनी लिओनीला CID ची नोटीस; २४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात होणार चौकशी

'कॉकरोच जनता पार्टी'ला आव्हान देण्यासाठी आली एल्विश यादवची खरगोश जनता पार्टी', जाहीरनामा प्रसिद्ध केला

वीकेंडला कुठे फिरायचं? मुंबई-पुण्याजवळची 'ही' निसर्गरम्य ठिकाणे; एका दिवसात होईल ट्रिप

पुढील लेख
Show comments