भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा
बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…
मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो….
मराठा तितुका मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा….
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…
महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला