suvichar

भाजपची निवडणूक तयारी, जबाबदारी वाटप पूर्ण

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (09:12 IST)
भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांसाठी जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. यात अमित शाह यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सहप्रभारी म्हणून काम पाहतील. कर्नाटकातील माजी आमदार लक्ष्मण सावदी हे देखील सहप्रभारी म्हणून काम पाहतील. तर महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे याही कार्यरत असतील.
 
दिल्लीची जबाबदारी भाजपने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर देण्यात आली आहे. यासोबतच माजी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी आणि बिहारचे खासदार नित्यानंद राय यांना दिल्लीचा सहप्रभारी नेमण्यात आलंय. दिल्लीसाठी प्रदेश संघटनाची जबाबदारी श्याम जाजू यांच्यावर, तर सहप्रभारी तरुण चुघ यांच्याकडे आहे.
 
महाराष्ट्रासोबतच हरियाणाचीही निवडणूक होत असते. हरियाणामध्ये भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना प्रभारी नियुक्त केलंय. तर संघटनाचे प्रभारी म्हणून डॉ. अनिल जैन काम पाहतील.झारखंडमध्ये ओम माथूर यांना प्रभारी, तर नंद किशोर यादव यांना सहप्रभारी नियुक्त करण्यात आलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

फ्रान्सच्या मायकल ओलिसेने पेले यांचा ५६ वर्षांहून जुना विक्रम मोडला, इंग्लंडच्या बेलिंगहॅमने मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी केली

गयानामध्ये ११६ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, ५३ जणांना वाचवण्यात यश आले

4 हजार वर्षांपूर्वीच्या राजकन्या युद्धकलेत पारंगत होत्या? ममींच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती

भूकंपामुळे नेपाळची भूमी हादरली, जाणून घ्या रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता

म्हात्रे यांच्यानंतर आता खंडणी प्रकरणात शिंदे शिवसेनेच्या एका महिला अधिकाऱ्यालाही अटक

पुढील लेख
Show comments