Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गळती लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवार यादी प्रसिद्ध करणार

Congress
, शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (10:26 IST)
नेत्यांच्या गळतीमुळे राष्ट्रवादी बेजार झाला आहे. पण पक्षाचे खासदार अमोल कोल्हे शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून खिंड लढवत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने काढलेल्या महापदार्फाश यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे.     
 
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची स्क्रिनिंग कमिटीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली.
 
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडायच्या यावरही चर्चा करण्यात आली. येत्या ५ सप्टेंबर रोजी छाननी समितीची बैठक होणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उदयन राजे भोसले सह अनेक करणार भाजपात प्रवेश