Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किती मतदार, मतदान केंद्र, मतदारांचे ओळखपत्र सर्व येथे माहिती जाणून घ्या

Webdunia
महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप...
 
एकूण मतदार
·      महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
·      महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.
·      यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी  68 लाख 75 हजार, 750
·      महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,
·      तृतीयपंथी मतदार-  2 हजार 634 आहेत.
·      दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत
·      सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत
 
 मतदार जनजागृती
·      आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी 14.40 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.
 
 जनजागृतीसाठी सदिच्छादूत
·      मतदार जागृतीच्या मोहिमेत ‘सदिच्छादूत’ म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.
 
मतदान केंद्रे
·      विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.
 
मुख्य मतदान केंद्र – 95, 473
सहायक मतदान केंद्र – 1,188
 
·      खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन केली जातील.
 
मतदारांसाठी सोयी-सुविधा
·      किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.
·      दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे.
·      सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था
·      दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.
·      अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
·      लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.
 दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना
·      ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.
·   पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था.
 
यंत्रणा सज्ज
·   विधानसभा निवडणुकीसाठी  1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.
·   विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
 
 मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा
·   मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
·   या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
 
मतदारांच्या सुविधेसाठी
·   आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
·   ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता GPS Tracking App,
·   मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
·   मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु.
·   दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.
 
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
·  मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.
·  भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
1.  पासपोर्ट (पारपत्र)
2. वाहन चालक परवाना
3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,
  सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
4.  छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
5. पॅनकार्ड
6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती
निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
7. मनरेगा जॉबकार्ड
8.कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
10.  खासदार/आमदार 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Live News Today in Marathi शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

आता शेवटचे दिवस मोजा, खासदार पप्पू यादवांना पुन्हा धमकी

शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन, मी निवडणूक जिंकलो तर तरुणांचे लग्न लावून देईन

मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत 2 महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

पुढील लेख