मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या कारभारामुळेच भाजपा सत्तेत असल्याचं म्हटलं आहे. यवतमाळमध्ये प्रचारसभेत बोलत होते.
काँग्रेसवर टीका करताना भाजपा-शिवसेनेच्या यशाला काँग्रेस जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. “पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारमुळे भाजपा-सेनेला मदत झाल्याचंही ते म्हणाले आहेत.“गेली पाच वर्ष आणि त्याआधी सत्तेत येताना भाजपा-शिवसेना युती तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातून महाराष्ट्र का गेला? हे समजून घ्यायची गरज आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. बाळासाहेब विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. “राज्याचा विरोधी पक्षनेताच सत्ताधारी पक्षात गेला, आता हा पक्षांतराचा निर्णय त्या नेत्याने एका दिवसात घेतलेला नसेल. म्हणजे पाच वर्षात त्या विरोधी पक्षनेत्याने कोणता कणखर विरोध सरकारला केला असेल?,” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.