Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (16:08 IST)
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. जामखेडमधल्या मतदान केंद्र ५ आणि ६ वर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली.
 
या घटनेत जामखेड गावच्या उपसरपंचासह २ पोलिंग एजंट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अंबड येथील रुग्णालयात हलवन्यात आलंय. जामखेड हे गाव बदनापूर मतदारसंघात येतं. भाजपच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तू इकडे पोलिंग एजंट म्हणून का काम करतोस? या कारणावरून मारहाण केल्याचा आहे. 
 
तर दुसरीकडे सोलापूरच्या करमाळ्यात शिंदे आणि पाटील अशा दोन गटांत मतदारकेंद्रामध्येच हाणामारी झाली आहे. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमध्ये बोगस मतदानावरून वाद झाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडेंना दोन आठवड्यांचा दिलासा