विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मते मिळवून विजयी होण्याचा मान काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम तसेच राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी मिळवला आहे.
सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघातून विश्वजीत कदम हे एक लाख ६२ हजार ५२१ इतके मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात त्यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांना केवळ आठ हजार ९७६ मते पडली.
राज्यात विश्वजीत कदम यांच्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. दीड लाख मताधिक्य घेऊन त्यांनी भाजपाच्या गोपिचंद पडळकर यांचा पराभव केला. पडळकर यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.