शव पासून शिव होण्याचा प्रवास म्हणजे मूळापासून चैतन्य होण्याचा प्रवास आहे. 'शिवरात्रि' या सणानिमित्त महादेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. या दिवशी शिव मंत्र जप-हवन-अभिषेक हवन याचे महत्त्व आहे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी देखील महादेवाची विधीपूर्वक पूजा करावी. पूजा करताना अनेक प्रकाराचे शिवलिंग आपल्या आवश्यकतेनुसार पुजले जातात. जाणून घ्या कोणत्या कार्यासाठी कोणत्या प्रकाराच्या शिवलिंगाची पूजा करावी ते-
1. पार्थिव शिवलिंग- प्रत्येक कार्य सिद्धीसाठी
2. गूळाचे शिवलिंग- प्रेम प्राप्तीसाठी
3. भस्माने निर्मित शिवलिंग- सर्वसुख प्राप्तीसाठी
4. जवस किंवा तांदुळाच्या पिठाने निर्मित शिवलिंग- दाम्पत्य सुख, संतान प्राप्तीसाठी
5. दह्याने तयार शिवलिंग- ऐश्वर्य प्राप्तीसाठी
6. पितळ, कांस्य धातूने निर्मित शिवलिंग- मोक्ष प्राप्तीसाठी
7. लीड निर्मित शिवलिंग- शत्रु संहारासाठी
8. पार्याचे शिवलिंग- अर्थ, धर्म, काम, मोक्ष प्राप्तीसाठी