Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधींनी लिहिलेले पुस्तके व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (17:36 IST)
महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशके त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले. या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.
 
गांधींनी काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)" हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "Indian Home" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last" चे गुजराती भाषांतर केले आहे. हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजराथीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परीक्षणसुद्धा ते करत असत.
 
गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.[२३]
 
गांधींनी लिहिलेली पुस्तके
Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
गांधी विचार दर्शन : राजकारण
गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
गांधी विचार दर्शन : हरिजन
नैतिक धर्म
माझ्या स्वप्नांचा भारत
 
गांधींवरील लिहिलेले पुस्तके
अनेक चरित्रकारांनी गांधींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
 
अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. रघुनाथ माशेलकर)
अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)
अज्ञात गांधी नावाचे पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र)
मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’ हे गांधींचे चरित्र लिहिले आहे, मुक्ता शिरीष देशपांडे यांनी ते मराठीत आणले आहे.
गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)
गांधीजींचे असामान्य ने्तॄत्व
गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधीजी होते म्हणून (बाळ पोतदार)
गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)
गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" (उल्लेखनीय)
दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)
बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाद्याय, मराठी अनुवाद - शोभा भागवत)
बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद - ना.गो. जोशी)
महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत)
The Death & Afterlife of Mahatma Gandhi (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)
लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
विधायक कार्यक्रम 
शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments