Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महात्मा गांधी पुण्यतिथी : बापूंचे विचार देतील आयुष्याला नवी दिशा

महात्मा गांधी पुण्यतिथी : बापूंचे विचार देतील आयुष्याला नवी दिशा
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (09:07 IST)
जग बदलायचं असेल आधी स्वत:ला बदला.
 
मौन सगळ्यात सशक्त भाषण आहे, हळूहळू लोक तुमचे ऐकायला लागतील. 
 
असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.
 
तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता, यातना देऊ शकता, एवढेच नाही तर माझे शरीर नष्ट करु शकता पण तुम्ही माझे विचार कधीच बंदीस्त करुन ठेऊ शकत नाही.
 
केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे, जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील.
 
स्वत:ला इतरांच्या सेवेत समर्पित करा. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल.
 
पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल.
 
आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो.
 
माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अहिंसा त्याला प्राप्त करण्याचे साधन.
 
आरोग्यच तुमचा खरा दागिना आहे. सोन्या, चांदीपेक्षाही याचे मूल्य जास्त आहे.
 
तेव्हाच बोला जेव्हा तुमचे बोलणे मौन धारण करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असेल. 
 
माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही.
 
व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते. 
 
एखादी व्यक्ती केवळ आपल्या विचाराने बनते, जो तो विचार करतो तोच तो बनत असतो.
 
जेव्हा तुमचा सामना तुमच्या विरोधकांशी होईल. त्यावेळी त्याला प्रेमाने जिंका.
 
क्रोध आणि असहिष्णुता हे खरे शत्रू आहेत. 
 
शक्ती शारिरीक क्षमतेमुळे येत नाही. तर ती तुमच्या ईच्छाशक्तीमुळे येते.
 
एक चांगली व्यक्ती ही प्रत्येक सजीवाचा चांगला मित्र असते.
 
कमजोर व्यक्ती कधीही माफी मागत नाही. पण क्षमा करणे हे एका ताकदवान व्यक्तीचे विशेष आहे.
 
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसले तरी चालेल. पण हृदय हवे कारण हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. 
 
चूक स्विकारणे हे केर काढण्यासारखे आहे. जे तुमचे मन स्वच्छ आणि साफ करते.
 
आपल्या ज्ञानावर अधिक विश्वास ठेवणे मुर्खपणा आहे. या गोष्टीची आठवण करुन देणे गरजेचे आहे की, सगळ्या मजबूत कमजोर पडू शकतो आणि हुशार व्यक्तीकडून चुका ही होऊ शकतात.
 
तुम्ही जे काही करत असाल तर इतरांसाठी कदाचित नगण्य आहे पण तुम्ही ते करणे गरजेचे असते.
 
तुम्ही आज काय करता त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.
 
जर तुम्ही रामासारखे वागू शकत नसाल तर तुमच्या रामायणपठणाला काहीच अर्थ नाही. 
 
जर तुम्ही काहीही केले नाही तर तुमच्या आयुष्य जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ?