Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोरन्हाण कां करायचे? यामागील शास्त्र जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2020 (15:28 IST)
ALSO READ: Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातले जातात. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य आहे. पण काही जण हे रथ सप्तमी पर्यंत करतात. वयोगट 1 वर्षांच्या मुलानं पासून वयोगट 5 वर्षांचे मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो.

बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात, व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. ह्यालाच बोरन्हाण असे म्हणतात.
 
बोरन्हाण कां करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नांवाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. 
ALSO READ: Bornahan बोरन्हाण करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील शास्त्र जाणून घ्या
लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

नीम करोली बाबांचे हे १० विचार तुमचे जीवन बदलतील

आरती मंगळवारची

मारुतीच्या ८ गुप्त शक्ती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments