suvichar

संक्रांती: भोगीचं महत्त्व जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (11:54 IST)
‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊ या- 
 
या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. 
दारासमोर रांगोळी काढावी. 
घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे.
या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. 
भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.
या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे.
अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
 
भोगी साजरी करण्यामागील कारण
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. 
 
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. 
 
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” तर आसाममध्ये “भोगली बिहू” नावाने ओळखा जातो. पंजाबमध्ये “लोहिरी “, तर राजस्थानमध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो. 
 
या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहवा अश्या शुभेच्छा दिल्या जातात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

आरती सोमवारची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments