Daily Horoscope
✕

किंक्रांत 2024: किंक्रांतला काय करू नये जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2024 (09:13 IST)
किंक्रांत 2024:संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी,बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांति असते. या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू  समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. लहान मुलांचे बोरन्हाण देखील या दिवशी केले जाते.संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण देऊन  'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा देतात.
 
मकर संक्रांति चा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो. 
या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. देवीआईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई- बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात. या दिवशी देखील बायका हळदी कुंकू करतात. संक्रांतीचा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. बायका हळदी- कुंकूचा समारंभ रथ सप्तमी पर्यंत करतात. 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वर्षभर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीत तुमच्या घरातील या ६ कोपऱ्यांत दिवे लावा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

Kanakadhara Stotra कनकधारा लक्ष्मी स्तोत्र पाठ करा, धन सम्रुद्धीची भरभराटी येईल

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments