सर्वप्रथम तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने हाताने चोळून चोळून धुऊन घ्या. बटाटे सोलून लांब लांब तुकड्यात चिरून घ्या. फुलकोबीचे देखील मोठे तुकडे करून घ्या. आलं किसून ठेवा आणि हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
आता एका कढईत थोडं तूप घालून मुगाची डाळ गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या. भाजताना अजून तूप घालू नका. या तुपातच धुतलेले तांदूळ फुल कोबी, बटाटे अर्ध्या लीटर गरम पाण्यात मंद आचेवर शिजवून घ्या (पाणी आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करता येईल). लक्षात ठेवा की ह्याला झाकून शिजवायचे आहे.मधून मधून ढवळत राहा.
खिचडी पूर्णपणे शिजल्यावर समजावं की खिचडी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी एका पात्रात तूप गरम करून अख्खी लाल मिरची, जिरे, दालचिनी, तमालपत्र लवंग, वेलची आणि हिंगाची फोडणी तयार करून ही फोडणी खिचडीमध्ये वरून घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि हिरवी कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून तयार बंगाली खिचडी कढीसह सर्व्ह करा.