Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नववधूने केली मंगळग्रह मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

नववधूने केली मंगळग्रह मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
, शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (14:36 IST)
अमळनेर- ज्या भाविकांचा व्यवसाय रेती, माती व शेतीशी निगडीत आहे असे भाविक म्हणजेच बिल्डर, डेव्हलपर, शेतकरी, शेतमजूर, दलाल, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट श्री मंगळग्रहाला अराध्य दैवत मानतात. ही सर्व मंडळी मोठ्या श्रध्देने येथील श्री मंगळदेव ग्रहाच्या व भुमीमातेच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात. पूजा- अभिषेक करतात.
 
शहरातील प्रसिध्द बिल्डर व डेव्हलपर सरजूशेट गोकलानी व त्यांच्या परिवाराचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर श्रध्दास्थान आहे. त्यांचा सिव्हिल इंजिनिअर असलेला मुलगा आशिष यांचा काही दिवसापुर्वी अहमदनगर येथील सिमरन यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. 10 फेब्रुवारी रोजी हा विवाह होण्यापूर्वी लग्नासाठी अहमदनगर येथून हेलिकॉप्टर मधून आलेल्या नववधू सिमरन यांनी मंगळग्रह मंदिरावर पुष्पवृप्टी करुन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्या विवाहस्थळी गेल्या.
 
दरम्यान मंदिरावर पुष्पवृष्टी होणार ही बाब पूर्वनियोजित असल्याने अनेकांना माहित होती. त्यामुळे मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी तर मंदीरावरून जमिनीवर पडलेल्या फुलपाक प्रसादस्वरूप घरी नेल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Holi 2023: या 4 राशींसाठी भाग्यवान आहे या वर्षाची होळी