Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Mangal Grah Mandir फॉगिंग सिस्टम असलेले देशातील एकमेव मंगळग्रह मंदिर

Mangal Grah Mandir फॉगिंग सिस्टम असलेले देशातील एकमेव मंगळग्रह मंदिर
, मंगळवार, 4 एप्रिल 2023 (11:44 IST)
Mangal Grah Mandir महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धुळ्याजवळ अमळनेर येथे मंगळाचे प्राचीन व जागृत मंदिर आहे. दर मंगळवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी आणि अभिषेक करण्यासाठी येतात. दर्शनासाठी कोणतेही व्हीआयपी शुल्क आकारले जात नाही, प्रत्येकाला दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते.
 
जळगाव जिल्ह्य़ात बहुतांश वेळा उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यात तर अधिकच उकाडा असतो. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उकाडा जाणवू नये, यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी फॉगिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे, जेणेकरून आजूबाजूचे वातावरण थंड राहावे. भाविकांना उन्हापासून दिलासा मिळतो आणि ते त्रास न होता मंगळ देवतेचे दर्शन घेतात.
webdunia
विशेष म्हणजे देश-विदेशातून हजारो लोक मंगळ ग्रह मंदिरात मंगळ दोष आणि मांगलिक दोष शांत करण्यासाठी येतात, जिथे मंगळ अभिषेकाने शांत होतो. जे मांगलिक आहेत किंवा ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी येथे मंगळाची सामूहिक आणि विशेष पूजा आयोजित केली जाते. असे म्हटले जाते की मंगळवारी येथे येऊन मंगळ पूजा आणि अभिषेक केल्यास मंगळ दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती सुखी वैवाहिक जीवन जगते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Easter Sunday 2023 ईस्टर संडे का साजरा केला जातो, जाणून घ्या 5 खास गोष्टी