Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा

Manglik Matrimony in Maharashtra
, गुरूवार, 2 मार्च 2023 (16:52 IST)
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात कुंडलीत मंगळयोग असलेल्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय पत्रिकेच्या मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 
ज्या मुला- मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो, मनासारखे विवाह योग जुळत नाहीत, असे भाविक मोठ्या संख्येने अभिषेकसाठी येतात. कुंडलीत मंगळ योग असलेल्या वधू वरांचे विवाहकार्य जुळून येण्यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेच्यावतीने अभिषेकसाठी आलेल्या व मंगळयोग असलेल्या वधू वरांकडून नाव, जन्म तारीख, जन्मस्थळ, वय, शिक्षण, व्यवसाय, गोत्र, आई वडीलांसह अन्य नातेवाईकांची माहिती भरून घेतली जात आहे. 
 
या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात मांगलिक असलेल्या बहुतांश जाती - धर्मियांतील  वधू वरांची माहिती मंगळग्रह मंदिरात उपलब्ध होणार आहे. 
 
या उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस.बी. बाविस्कर, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव आदी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Holi 2023 धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी करा चंद्रदेवाला प्रसन्न