Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील एकमेव असे मंदिर जेथे अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंग पॉइंट

Webdunia
मंगळ ग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील देशातील प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. दर मंगळवारी येथे हजारो भाविक मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर संस्थेने अनेक मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
पार्किंग, पादत्राणे, शुद्ध पाणी, मंगळ टिका आदी मोफत सुविधांसोबतच आरोग्य तपासणीही केली जाते. भाविकांना उकाडा जाणवत असल्याने येथे फॉगिंग यंत्रणाही बसविण्यात आली आहे. येथील विशेष बाब म्हणजे मंगळवारी गर्दी असूनही व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था नाही.
 
तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात किंवा कुठेही गेलात तर काही वेळाने तुमच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते. पॉवर बॅकअप असेल तर काम होईल अन्यथा चार्जिंग पॉइंटसाठी भटकत राहाल. पण जर तुम्ही मंगळ देवाच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंट देखील बनवण्यात आले आहेत.
 
या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगसाठी ठेवू शकता. या जागेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते. मोबाईल चार्जिंगला लावून कुठेही गेलात तरी घाबरायची गरज नाही. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच येथील सेवेकरी चहुबाजूंनी जागरुकता ठेवून भाविकांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर असतात. मात्र, तुम्ही तुमच्या मोबाइलवर स्वत: लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Vivah Upay हा एक उपाय प्रबोधिनी एकादशीला घरातील एका कोपर्‍यात करा, विवाह योग घडून येईल

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

Prabodhini Ekadashi 2024 प्रबोधिनी एकादशीला उपास करण्याचे 9 फायदे

तुळशी आरती संग्रह

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments