Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मांगलिक मुलीचे लग्न फक्त मांगलिक मुलाशीच झाले पाहिजे का ?

Manglik Dosh Remedies
Manglik Dosh असे मानले जाते की मांगलिक मुलीचे लग्न मंगालिक मुलाशी करावे अन्यथा वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात. ते खरे आहे का? मांगलिक मुला-मुलीनींच आपसात लग्न करावे का?
 
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळ तीन प्रकारचा मानला जातो - सौम्य मंगळ, मध्यम मंगळ आणि कडक मंगळ. असे म्हणतात की सौम्य मंगळाचा दोष नसतो, वयाच्या 28 व्या वर्षी त्याचा दोष संपतो. कडक मंगळ दोष दूर करण्यासाठी शांती करण्याची गरज असते आणि केवळ या लोकांना लग्नाच्या संबंधात कुंडली जुळण्याची गरज सांगितली जाते.
 
ज्योतिष शास्त्रानुसार जर मुलगा मांगलिक असेल आणि मुलीला मंगळ नसेल तर लग्न होऊ शकते. मात्र त्यासाठी मुलीच्या कुंडलीत दुसऱ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात राहू, केतू आणि शनी बसले पाहिजेत.
 
जर मुलगा किंवा मुलगी यापैकी एकाला मध्यम मांगळ असेल आणि दोघांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांचे लग्न होऊ शकते कारण 28 वर्षानंतर मांगलिक दोष संपतो. अशा स्थितीत विवाहापूर्वी पंडिताच्या सल्ल्याने मांगलिक दोषाची शांती केली पाहिजे.
 
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असेल आणि कुंडलीत शनि, गुरु, राहू किंवा केतू समोर बसले असतील तर मांगलिक दोष आपोआप संपतो आणि मंगळ नसणार्‍यांशी लग्न होऊ शकतं.
 
मांगलिक कुंडलीत मंगळासोबत शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा शुभ ग्रह केंद्रात असतील तर मांगलिक दोष लागत नाही. यासोबतच जर मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत मंगळ ज्या ठिकाणी बसला असेल त्याच ठिकाणी शनि, राहू किंवा केतू असेल तर मंगळाचा दोष संपतो.
 
घट विवाह, अश्वथ विवाह, भट पूजा किंवा मंगल देव अभिषेक केला असता मांगलिक गैर-मांगलिकाशी विवाह करू शकतात.
 
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असलेल्या मंगळाच्या प्राचीन मंदिरात दर मंगळवारी पंचामृत अभिषेक, नित्य प्रभात श्री मंगल अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, सामूहिक अभिषेक आणि हवनात्मक अभिषेक केला जातो. जर तुमचा मंगळ सौम्य असेल तर तुम्ही सामूहिक अभिषेक करू शकता आणि जर तुमचा मंगळ मध्यम असेल तर तुम्ही स्वतंत्र किंवा एकल अभिषेक करू शकता, परंतु जर तुमचा मंगळ कडक असेल तर तुम्हाला हवन पूजा आणि अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

18 जुलैपासून सुरू होत आहे अधिक मास, जाणून घ्या महत्त्व, महिनाभर काय करावे, काय नाही