Dharma Sangrah

मराठा आंदोलनात भाडोत्री लोक घुसले

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (14:45 IST)
मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले असतानाच महसूलंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनात काही भाडोत्री लोक घुसले असल्याचे धक्कादायक विधान केले आहे. पाटील यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
मराठा आंदोलनातील भाडोत्री लोकांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. हे आंदोलन बदनाम करायचे आहे, असा आरोप करतानाच आरक्षण देणे आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून काहीही उपयोग होणार नाही. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा, असे पाटील म्हणाले.
 
गाड्या फोडून काय साधणार
आंदोलन करून, गाड्या फोडून काहीही साध्य होणार नसल्याचे सांगतानाच आंदोलकांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे निवडणूक वर्ष असल्याने या काळात हिंसक आंदोलनासारखे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे खर्‍या आंदोलकांनी या हिंसक प्रवृत्तींना आणि पेड आंदोलकांना बाजूला सारले पाहिजे, असे महसूलंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार

कांदिवली लोखंडवाला येथे बीएमसी महिला अधिकाऱ्यांवर हल्ला, किरीट सोमय्या यांनी कडक कारवाईची मागणी केली

स्वप्नील थोरात यांनी मुंबईचे नवे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

गायरान जमीन निर्णय : हजारो कोटींच्या गायरान जमिनी महापालिकांच्या ताब्यात देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

अजित पवार विमान अपघात प्रकरण : आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

पुढील लेख
Show comments