Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षण : शरद पवारांनी मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका घ्यावी - प्रकाश आंबेडकर

Maratha reservation: Sharad Pawar should take a clear stand on Maratha reservation - Prakash Ambedkar
, शनिवार, 29 मे 2021 (20:35 IST)
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आरक्षण हे अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल होत आहे, पण इथला राज्यकर्ते ते मानायला तयार नाही.येणाऱ्या सरकारला आरक्षण मुद्दा त्रासदायक होईल नव्हे काहीवेळा राज्यसत्ता चालवायला अडचण येईल
 
"राज्यकर्त्यांची इच्छा हवी होती रिव्ह्यू पिटीशन नाही तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत करायला हवं. राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून पुनर्विचार याचिका करू शकतो. राज्यसत्तेशिवाय हे होणं अशक्य आहे."
 
ते पुढे म्हणाले, "शरद पवारांचं राजकारण 40 वर्षं बघतोय, ते नरो-वा कुंजरो वा असं करतात. पण, सगळ्याच विषयात असं करून चालत नाही. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. आपण अपेक्षा करूया ते काहीतरी भूमिका घेतील."
 
"शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय," असंही ते पुढे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "गायकवाड समितीचा अहवाल त्रुटी भरून काढून लागाव्या लागतील, परिस्थिती प्रतिकूल, प्रयत्न करू. लवकरात लवकर दिल्लीत गोलमोज परिषद घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सगळे खासदार यांना बोलावणार."
 
उदयनराजे आणि मी वेगळा नाही, भेटायला काहीच अडचण नाही, असंही ते पुढे म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचं निधन झालं, त्यांच्यासाठी सरकारची नवी योजना