Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्र राजे

Webdunia
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (08:40 IST)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

honour killing In Jalgaon :जळगावमध्ये माजी सीआरपीएफ अधिकाऱ्याने मुलीची हत्या करून जावयाला जखमी केले

रशियन जनरलच्या हत्येचा आरोपीला अटक,गाडीत ठेवलेली स्फोटके

DC vs RCB :आरसीबीचा सातवा विजय, दिल्लीवर 6 गडी राखून विजय

MI vs LSG : मुंबईने आपला सहावा विजय नोंदवला,लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव

पुढील लेख
Show comments