Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकदाचा ह्या केसचा निपटारा होणं गरजेचं आहे : संभाजी राजे

This case
Webdunia
सोमवार, 7 डिसेंबर 2020 (16:44 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायायाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी, महाराष्ट्र सरकार तयार असल्याचं सांगतानाच, दुसरी बाजूही भक्कम असायला हवी, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्याच्या सुनावणीसंदर्भात माहिती देताना सरकारला प्रश्नही विचारला आहे. 
 
''आपण सर्वजण ०९.१२.२०२० ची आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचा स्टे वेकेट करण्यासंबंधीचा अर्ज सुनावणीसाठी घटनापीठासमोर लागलेला आहे. जर माननीय सर्वोच्च न्यायालायने सरकारचा अर्ज मान्य केला तर मी मराठा समाजच्या वतीने सरकारच खूप अभिनंदन करेन. जर स्टे वेकेट झाला नाही तर सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीवर म्हणणे मांडण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. आपण अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाज्याच्या डोक्यावर ठेवणार? एकदाचा ह्या केसचा निपटारा होणं गरजेचं आहे,'' असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केलंय. संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ खडसे यांना टॅग केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'मेरी सहेली' महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करेल, RPF ची जनजागृती मोहीम

US-China व्यापार करारानंतर भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, प्रमुख शहरांमध्ये नवीनतम दर काय आहे?

३ दिवसांत ६ घरांचे चुले विझले, चंद्रपूरच्या जंगलात वाघीणचा दरारा

ट्रम्प हे कुटुंबाचे देवता आहेत! संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, मोदी-शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

LIVE: बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची नव्याने चौकशी होणार

पुढील लेख
Show comments