Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे : विनायक मेटे

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (17:01 IST)
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.  “मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोबत घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील सर्वच समाज घटक त्यांच्या नेतृत्वात काम करतील. त्यामुळे उदयन महाराजांनी धुरा सांभाळावी” असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
 
“या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असं विनायक मेटेंनी म्हटलं आहे.
 
“मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मात्र एकमेकांना पूरक नसलेली किंवा एकवाक्यता नसलेले विचार दिसतात. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे” असे विनायक मेटे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments