Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही : चंद्रकांत पाटील

तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही : चंद्रकांत पाटील
, शनिवार, 13 मार्च 2021 (16:07 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धारेवर धरलं आहे. “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर शरसंधान साधलं आहे.
 
मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
 
“तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्प्परे, देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण राज्यातले