Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरती सोमवारची

Webdunia
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥
टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥
ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥
निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥
आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥
नृत्य करितां शेष करी डळमळ ॥
कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥
भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥
गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
कड कड कड कड आकाश तडके दारुण ॥
गड गड गड गर्जे गर्जे गगन ॥
चळ चळ चळ चळ पृथ्वी कापे त्रिभुवन ॥
धिग धिग धिग नृत्य करि गजानन ॥जयदेव ॥३॥
तेहेतिस कोटि देव वर्णिति सीमा ॥
परमानंद पूर्ण ब्रम्ह परमात्मा ॥
अगणित गुण सागर भाळीं चंद्रमा ॥
नातुडें सुरवरां नकळे महिमा ॥जयदेव ॥४॥
ऐसें तांडव नृत्य झालें अद्‌भुत ॥
हरि हर ब्रह्मादिक उभे तटस्थ ॥
मोरया गोसावी योगी ध्यानस्थ ॥
एकरुप होउनि ठेले द्वैता अद्वैत ॥जयदेव ॥५॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

नीम करोली बाबांचे हे १० विचार तुमचे जीवन बदलतील

आरती मंगळवारची

मारुतीच्या ८ गुप्त शक्ती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments