Marathi Biodata Maker
✕

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

Webdunia
मंगळवार, 11 मे 2021 (09:31 IST)
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
 
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!
 
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!
 
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!
 
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?

Mangalwar Upay: हनुमान चालिसामध्ये दडले आहे, रोग-दोष निवारणाचे रहस्य!

दिवाळीत कुटुंबासोबत फिरण्यासाठी भारतातील ७ सुंदर ठिकाणे; बजेटनुसार निवड करा

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

वक्रतुंड संकष्टी चतुर्थी २०२६: असुराचा विनाश करण्यासाठी गणपती बाप्पाने का धारण केले होते 'वक्रतुंड' रूप?

सर्व पहा

नक्की वाचा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments