चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥...