suvichar

दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंदे

Webdunia
सोमवार, 6 डिसेंबर 2021 (12:37 IST)
जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ.॥
जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते । जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते । येती तडि तापडि यति भवदाश्रमातें । पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय.॥१॥
नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या । आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या । सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या । वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय.॥२॥
देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं । करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं । अनंत ब्रह्मांडांचे घट ज्याचे पोटीं । तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय.॥३॥
श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या । अखंड ऋद्धि-सिद्धि नांदति गिरिवरि त्या । चौसष्टअठरा करती त्वदगुणआवर्त्यां । विष्णु-दासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय.॥४॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

मृत्यूनंतर या लोकांना भोगावी लागते नरकाची शिक्षा, गरुड पुराणात आहे उल्लेख

Mohini Ekadashi 2026 मोहिनी एकादशी कधी? पूजा विधी आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना प्रसन्न करा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments