Publish Date: Thu, 24 Jul 2025 (06:56 IST)
Updated Date: Thu, 24 Jul 2025 (07:35 IST)
पंचप्राणांचे नीरांजन करुनी ।
पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ॥
मोहममतेचें समूळ भिजवोनि ।
अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥
जय देव जय देव जय नीरांजना ।
नीरांजन ओंवाळूं तुझिया समचरणां ॥ ध्रु० ॥
ज्वाला ना काजळी दिवस ना राती ।
सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ॥
पूर्णानंदें धालों बोलों मी किती ।
उजळों हे शिवराम भावें ओंवाळिती ॥ जय देव जय देव० ॥ २ ॥