Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निरोप आरती: गणरायाला निरोप देताना नक्की म्हणावी ही आरती

Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (19:23 IST)
निरोप आरती
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥
 
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥
 
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥
 
मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥
 
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥
 
सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥
 
वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी ॥६॥
 
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥
 
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

लघुभागवत - अध्याय ८ वा

लघुभागवत - अध्याय ७ वा

लघुभागवत - अध्याय ६ वा

लघुभागवत - अध्याय ५ वा

लघु भागवत अध्याय ४ था

सर्व पहा

नक्की वाचा

ब्रेन क्लॉटिंगमुळे शरीरात दिसतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या यापासून बचाव कसा करावा

आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

2024 हरतालिका तृतीया कधी आहे ? तिथी जाणून घ्या

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

Wallet in Back Pocket तुम्ही पाकिट मागच्या खिशात ठेवत असेल तर सवय सुधारा, नाहीतर पैसा कधीच स्थिर राहणार नाही

पुढील लेख
Show comments