suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री खंडेरायाची आरती

khanderayachi aarti marathi image
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
ALSO READ: खंडोबाचीं पदें
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
 
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
ALSO READ: खंडोबाची आरती
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥
ALSO READ: श्री खंडोबा महाराज तळी आरती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गकारादि गणेश सहस्रनाम स्तोत्रम् : श्रीगणेशाच्या सहस्र नामांचे पठण आणि धार्मिक महत्त्व