Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मूलांकानुसार जाणून घ्या आपल्या शुभ दिवस आणि रंग

Astrology 2018
मूलांक 1
 
शुभ तारीख- 1, 10, 19, 28, 3, 5, 7, 9
शुभ रंग- पिवळा, नारंगी, सोनेरी, गुलाबी
शुभ दिवस- रविवार, सोमवार
शुभ रत्न- माणिक्य
शुभ देव- प्रभू राम व सूर्य ('ॐ ह्रीं सूर्याय नम:' मंत्र जपावे आणि पहाटे सूर्याला जल चढवावे) 
 
आरोग्य: हृदयरोग, रक्त संबंधी रोग व नेत्र रोगापासून बचाव करा. आहारावर नियंत्रण असू द्या. रविवारी मीठ खाणे टाळा. व्यर्थ खर्च करू नका. स्त्री संबंधांप्रती विशेष काळजी घ्या. वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्या. वर्षाच्या शेवटी विशेष काळजी घ्या.
Astrology 2018
मूलांक 2
 
शुभ तारीख- 2, 4, 6, 9, 11, 20 आणि 29
शुभ रंग- हलके चमकणारे रंग किंवा पांढरा
शुभ दिवस- सोमवार
शुभ रत्न- मोती चांदीच्या अंगठीत धारण करावे
शुभ देव- महादेव व चंद्र. 'ॐ सों सोमाय नम:' किंवा 'ॐ नम: शिवाय' मंत्र जपण्याने सुख-शांती राहील.
 
आरोग्य- मज्जासंस्थेचा रोग, पोटातील रोग आणि सांसर्गिक आजारापासून बचाव करा. पायी चालणे व योगक्रिया तसेच आहारात सतर्कता ठेवल्याने रोगांपासून मुक्ती मिळेल.
Astrology 2018
मूलांक 3
 
शुभ तारीख- 1, 3, 5, 7, 9, 12, 21 व 30
शुभ रंग- पिवळा, व्हायलेट, गुलाबी, क्रीम
शुभ दिवस- सोमवार व गुरुवार
शुभ रत्न- पुखराज (पिवळा) सोन्यात
शुभ देव- विष्णू, शालिग्राम व स्वत:चे गुरु
 
आरोग्य- त्वचारोग, सांसर्गिक रोग, गुप्त रोगापासून वाचा. लठ्ठपणा, पोटासंबंधी आजार होऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवून व्यायाम करावे.
Astrology 2018
मूलांक 4
 
शुभ तारीख- 2, 4, 5, 6, 8, 9, 22 व 31
शुभ रंग- निळा, खाकी, तपकिरी आणि चमकदार रंग
शुभ दिवस- शनिवार, रविवार व सोमवार
शुभ रत्न- नीलमणी (मोरपंखी)
व्रत- सोमवार आणि गणेश चतुर्थी व्रत
 
आरोग्य- अशक्तपणा, संसर्गजन्य रोग, सर्दी फुफ्फुसांच्या रोग होऊ शकतात. जनावरांचे नख, दात यानेही नुकसान होऊ शकतं.
Astrology 2018
मूलांक 5
 
शुभ तारीख- 1, 3, 4, 5, 7, 8, 14 आणि 23
शुभ रंग- हलका हिरवा, पिस्ता, श्वेत आणि तपकिरी रंग
शुभ दिवस- सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
शुभ रत्न- पन्ना
शुभ देव- देवी लक्ष्‍मीची चांदी किंवा स्फटिकाची मूर्ती स्थापित करावी तसेच बुधवारचा उपवास शांती प्रदान करेल
 
आरोग्य- ताप, सर्दी संसर्गजन्य रोगापासून बचाव करा. नर्व्हसचे आजार, मधुमेह, ब्लड प्रेशर यामुळे परेशान राहाल. पक्षाघात होण्याची शक्यता आहे.
Astrology 2018
मूलांक 6
 
शुभ तारीख- 2, 4, 6, 9, 15 व 24
शुभ रंग- हलका निळा, पिवळा, गुलाबी व चमकदार पांढरा रंग
शुभ दिवस- बुधवार व शुक्रवार
शुभ रत्न- डायमंड
व्रत- संतोषी माता आणि देवी लक्ष्मीची पूजा-अर्चना करावी.
 
आरोग्य- नशा करणे टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. फुफ्फुसांशी संबंधित रोग, मूत्र रोग, गुप्त रोग आणि पोटातील रोग होऊ शकतात.
Astrology 2018
मूलांक 7
 
शुभ तारीख- 1, 3, 5, 7, 8, 9, 16, 25 व 30
शुभ रंग- पांढरा, हलका निळा, हलका ग्रे
शुभ दिवस- रविवार, सोमवार व बुधवार
शुभ रत्न- लहसुनिया
व्रत- मंगळवार व्रत आणि हनुमानाची पूजा अर्चना केल्याने कष्ट कमी होतील. रविवार संध्याकाळी नृसिंह देवाचे पूजन करावे.
 
आरोग्य- रक्त संबंधित समस्या, पोटातील आजार, खोकला, जीव घाबरणे याने समस्या होऊ शकते. नशा करणे टाळा. पायी चालणे लाभदायक ठरेल.
Astrology 2018
मूलांक 8
 
शुभ तारीख- 3, 5, 7, 8, 17 व 26
शुभ रंग- काळा, निळा, तपकिरी, व्हायलेट
शुभ दिवस- शनिवार
शुभ रत्न- नीलमणी
व्रत- शनिवार व्रत आणि लेदर, लोखंड दान करावे. घरात गूग्गल धूप द्या.
 
आरोग्य- नर्व्हस, हाडं व पोटातील रोगापासून वाचावे. वृद्धत्व संबंधित रोग दिसतील. आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये.
Astrology 2018
मूलांक 9
 
शुभ तारीख- 1, 2, 3, 4, 6, 7, 9, 18 व 27
शुभ रंग- लाल
शुभ दिवस- मंगळवार व शुक्रवार
शुभ रत्न- मूंगा
शुभ देवता- हनुमानजी तसेच मंगळवार व्रत शुभ राहील.
 
आरोग्य- फ्रॅक्चर, सांधेदुखी, मेंदू आणि डोळ्या संबंधित आजार होऊ शकतात. व्यायाम करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (26.12.2017)