suvichar

साप्ताहिक राशीफल 10 ते 16 डिसेंबर 2018

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:55 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधानता ठेवणे उचित ठरेल व होणारा पिडायोग टळेल. अडथळय़ांचा सामना करावा लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील. धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करावा लागेल. दूर निवासी प्रिय व्यक्तींचे भेटीयोग जुळून येतील व काळजीचे सावट दूर होऊ शकेल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथमचरणात संततीबाबत आनंद वार्ता येईल. सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत असणारी चिंता मिटेल व संततीबाबत आनंदवार्ता हाती येईल. काही प्रमाणात हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीबरोबर असणारी संघर्षकारक परिस्थिती निवळेल. आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात कौटुंबिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्यांबरोबर असणारे मतभेद मिटतील. जवळचा प्रवास योग जुळून येईल व मनोनुकूल यश मिळेल. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. आरोग्य व्यवस्थितरीत्या कार्यरत राहील. जुन्या आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. जवळचा प्रवास योग महत्त्वपूर्ण कामासाठी जुळून येईल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारीवर्गाकडून अपेक्षित स्वरूपाचे असणारे सहकार्य वेळेवर मिळेल. कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व प्रस्थापित राहून बक्षीस मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील व पारिवारिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक शांतता व समाधान लाभेल व यश समोर दिसेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरू शकेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत व होणारे नुकसान टळू शकेल. अंतिम चरणात सर्वत्र सहजरीत्या केलेले प्रयत्न सफल होतील.सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी बक्षीसपात्र स्थितीत राहील व यशस्वीतेचा मार्ग खुलेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील, अशी एखादी घटना घडेल व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढेल व शांतता टिकून राहू शकेल. अंतिम चरणात इतरांकडून येणे असलेला पैसा या ना त्या कारणापरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावर राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला फक्त ऐकण्यापुरताच र्मयादित ठेवणे उचित ठरेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. अंतिम चरणात मानसिक शांतता काही प्रमाणात मिळेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास तत्पर स्थितीतच राहून वेळेवर सहकार्य मिळेल.
 
वृश्‍चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेंसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील व काळजीचे सावट मिटेल. अंतिम चरणात मनाविरुद्ध खर्चाच्या प्रसंगास सामोरे जावे लागेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील व मनावर असलेले काळजीचे सावट कायम राहू शकेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील प्रगतीचे पुढचे पाऊल पुढेच ठेवणारी ग्रहस्थिती आहे. नोकरीत अधिकार करण्याचे योग जुळून येतील. अंतिम चरणात लाभाचे प्रमाण वाढेल व दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूलरीत्या दूरध्वनी येतील. अचानक धनलाभ योग आहेत. त्यामुळे लॉटरी वगैरेंसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही व यश मिळेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल. विविध प्रकारच्या आनंदवार्ता हाती येतील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरुपाचे सिद्ध होऊन मानसिक शांतता टिकून राहील. स्थगित व्यवहार सुरळीत मार्गावरून पूर्ण होतील. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार व्यवहार मनोनुकूलरीत्या पूर्ण होतील. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहून यश समोर दिसेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारचे अडथळे निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. प्रियव्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे काम पूर्ण होऊ शकतील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगला लाभ घडेल व नवीन भागीदारी प्रस्ताव समोर असल्यास त्याचा जरूर जरूर स्वीकार करावा. हितप्रद ठरेल. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामांचा अंदाज घेणे उचित ठरेल. गुंतवणूक विशेष सावधानता ठेवूनच करणे हितावह स्वरुपाचे सिद्ध होऊ शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Kurma Jayanti 2026 भगवान विष्णूंना का घ्यावा लागला कासवाचा अवतार? जाणून घ्या त्यामागील पौराणिक कथा

Buddha Purnima 2026 Wishes in Marathi बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा

Sant Tukadoji Maharaj Jayanti 2026 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

Narasimha Jayanti 2026: ३० एप्रिल रोजी साजरी होणार नृसिंह जयंती: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी

श्रीनृसिंहाची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments