Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑक्टोबर 2019चे राशी भविष्यफल

Webdunia
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:19 IST)
मेष : हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल. नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

वृषभ : सावध राहा, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल. इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे. तयार राहा, नशीब आपले दार ठोठावणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी मिळेल, पण तितकेच थकायलाही होईल. चांगल्या बातमीने मन खुश होईल, पण अधिक भावनिक होऊ नका. विद्यार्थी वर्गाला एकाग्र चित्त होण्यासाठी अतिशय मेहनत करावी लागेल. 

मिथुन : काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. जीवनात काही आश्चर्यकारक घटना घडतील. अशा वेळी आपले मित्र साहाय्यभूत ठरतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासात अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रकरणे मनस्ताप देऊ शकतात. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे टाळा.

कर्क : तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या. 

सिंह : या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा. चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल.  

कन्या : तुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. 

तुळ : जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदार प्रसन्न आणि अपत्य संतुष्ट राहतील. एकुणच तुमच्यासाठी हा चांगला महिना आहे. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. काही लोकं तुमची प्रतिमा खराब करु शकतात. शेजारी तुम्हाला सहकार्य करतील. धनाचे योग सामान्य आहेत. धार्मिक कार्यात वेळ दिल्यामुळे लाभ होईल. आविवाहितांच्या जीवनात प्रेमाची झुळूक येऊ शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल. 

वृश्चिक : महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात निरसता येत आहे, जोडीदारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.

धनु : सर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही. नोकरीत परिस्थिती साधारण राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, जर तुम्ही त्यासाठी तयार असाल. मित्र मदतीसाठी पुढे येतील.

मकर : या महिन्याच्या सुरुवातीत गुरूचा उदय होईल आणि त्याच्या प्रभावामुळे तुमच्या भाग्याचा उदय होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही खटकेल. अपेक्षित फळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना निराशा येईल. कुटुंबातील लोकांमुळे तुम्हाला विपरीत स्थितिचा सामाना करावा लागणार आहे. 

कुंभ: या वेळेस तुम्ही मित्र आणि भाऊ बहिणींसोबत फिरायला जाण्याचा प्रोग्रॅम बनवाल. तुमचे शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. नव्या जबाबदार्‍या मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. काही लोकांसाठी हे मनाजोगे नसेल. जोडीदार मजबूत स्तंभासारखा तुमच्यासोबत उभा ठाकेल. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. विद्यार्थी जातक जे खासकरून सृजनात्मक आणि रचनात्मक विषयांशी जुळलेले आहे ते उत्तम प्रगति करतील.  

मीन : या महिन्यात प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते. हा आठवडा तुम्हाला मिळता-जुळता असेल. रागात तुम्ही तुमचेच नुकसान करुन घ्याल. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यतो आहे. कुठलाही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. आर्थिक बांधणीवर विशेष चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या वेळेस मित्र आणि मोठ्या लोकांच्या मदतीची अपेक्षा ठेवू शकता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय

Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments