Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनु राशी भविष्यफल 2019

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:02 IST)
धनु राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार शनी साडेसातीचे ओझे घेऊन बसला आहे. धनस्थानात केतू अधिक ताणतणाव निर्माण करील. व्ययातला गुरू रवीचा असहकार पाहता एकूण वर्षाच्या सुरुवातीला या ग्रहांची मदत शून्य असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या यशाविषयी आश्वत असाल, पण जसजसे वर्ष पुढे जाईल तशी ग्रहस्थिती सुधारत असल्यामुळे यश मिळेल. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. पराक्रमातील मंगळ नेपच्यून आणि एकादशातला शुक्र आणि आणि पंचमातला हर्षल यांच्या शुभ युतीतून खूप बदल घडून येईल. 
 
कौटुंबिक जीवन
हे वर्ष तुमच्या साठी खूप त्रासाच सिद्ध होणार आहे. तुम्हाला किती तरी प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागू शकेल. तुम्ही त्या अडचणीन वर तोड काढण्याचा भरपूर प्रयत्न करताल परंतु तरीही त्रास होतच राहतील. तुम्ही सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करताल परंतु त्याच्या उलट सगळ घडल. शांत राहावे. कौटुंबिक जीवनातील चढउतार येत्या वर्षात जाणवल्याशिवाय राहणार नाही. जुलैनंतर एकाकीपण जाणवेल. 10 मे ला पंचमात येणारा शुक्र कौटुंबिक पातळीवर समाधानाचे वातावरण निर्माण करेल. तर जुलै ऑगस्टमध्ये अष्टम आणि नवमस्थानातील शुक्र स्थावर इस्टेटीच्या कामांना उत्तम गती प्राप्त करून देईल. तूळ राशीतले शुक्राचे आगमन कौटुंबिक सुखात आनंद निर्माण करील. पाहुणेमंडळींच्या आगमनामुळे घराला घरपण लाभेल. 
 
आरोग्य
धनु राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तुम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवेल. प्रवासामुळे थकवा येईल. या वर्षात वाहन सांभाळून चालवा. डिप्रेशन आणि नकारात्‍मक विचारा पासून वाचण्या साठी किती तरी प्रकारच्या स्‍पोर्टिंग आणि क्रि‍एटिव एक्‍टिविटीज़ मध्ये भाग घ्यावा. ज्येष्ठांना पथ्यापाण्याकडे लक्ष ठेवावे. उतारवयात शरीर मनाला फार देद देत असते. पण आपण शरीराने जगत नसून मनाने जगत आहोत ही जाणीवच तुम्हाला मोठा आधार देईल.
 
करियर
करिअरचा विचार करता तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या वर्षी तुम्ही करिअरमध्ये खूप चढ-उतार अनुभवाल. तुम्हाला तुमच्या मेहेनतीचे फळ मिळेल. या वर्षात तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल किंवा तुमच्या पगारात वाढ होईल. दुसरीकडे, आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला विविध ठिकाणांहून आर्थिक मदत प्राप्त होईल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. करियर साठी चांगली वेळ आहे. किती तरी प्रकारची काम लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताल परंतु त्यात देखील उशीर होत राहील. प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाशी जुळलेली लोक चांगली काम करतील. बैंकिंग, फाइनेंस या क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना देखील फायदा होईल. शनि दशाभुक्ति अंतरा बरोबर गुरु, राहुच्या उपस्थितित तुम्हाला हा लाभ मिळेल. केतुची दशा चालू असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे शुभ फळ मिळू शकणार नाही. नोकरदार व्यक्तींनी येत्या वर्षात गाफील राहून चालणार नाही. वरिष्ठ मधाचे बोट दाखवून तुमच्याकडून जास्त काम करवून घेतील. 
 
व्यवसाय
2019 च्या राशीभविष्यानुसार तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कुटुंबियांकडून तुम्हाला मदत होईल. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा फर्म स्थापन केलीत तर तुम्हाला आर्थिक नफा होईल. आपले नुकसान आणि चुकीच्या निर्णयाचे जबाबदार तुम्ही स्वतः असता. आपल्या ईगो मुळे तुम्ही आपले स्वतःचेच नुकसान करून घेताल आणि पैशाचे देखील नुकसान करताल. थोडा फार फायदा होईल. कुठल्या ही प्रकारची पैशा बाबत संधी मिळाली तर ती सोडू नये. आपल्या द्वारे घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णया बाबत दोष आपल्या भाग्याला देऊ नये. खूप काहीतरी करायचे या विचारांनी साहस कराल. त्याचा फायदा पुढील दिवाळीनंतर मिळेल. दशमात येणारा शुक्र आर्थिक बाबतीत बेरंग करेल. देण्या घेण्यातील पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. पैसे उसने देण्यावरून संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.
 
रोमांस
या वर्षात तुम्ही तुमच्या शृंगारिक आयुष्याबद्दल गंभीर व्हाल. जोडीदाराशी काही वाद झाले तरी ते वाढवू नका, उलट चर्चेने ते वाद सोडवा. कुटुंबियांची प्रकृती उत्तम राहील. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या बारीकसारीक कुरबुरी राहतील. या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ मधून सगळे ग्रह कोसों दूर आहेत. जस चाललय तस चालून द्या. तुम्ही काही नवीन करण्याची ओढ करू शकता. अन्य ग्रहांच यात काही घेण-देण नाही. या वर्षी ठरलेले अथवा लाबलले विवाह, अथवा इतर शुभसमारंभ पार पडतील.
 
उपाय
दिवसातून दोन वेळा आदित्‍य ह्रदय स्‍तोत्र आणि कनकधरा स्‍तोत्राच पठन करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा

विजया स्मार्त एकादशी 2024: विजया स्मार्त एकादशीचे महत्त्व, पूजाविधी जाणून घ्या

आरती बुधवारची

उपवास रेसिपी : मखाना खीर

4 प्रकारच्या अन्न अकाली मृत्यूचे कारण! गीतामधील नियम जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments