Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेष राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊ या

Webdunia
मेष : कार्ड : Judgement
या वर्षी तारे आपल्या पक्षात आहे. त्यामुळे आपणांस यशाची प्राप्ती होईल. प्रत्येक काम आपल्या मनाजोगते राहतील. हे संपूर्ण वर्ष आपणांस संस्मरणीय राहील. नवे उद्योग सुरू कराल. आपले उत्पन्न वाढतील. व्यावसायिक भागीदाराशी सावधगिरी बाळगा. त्यांचे व्यवहार आपल्याशी प्रामाणिक आहे ह्याची खात्री करून घ्या. आपल्या सर्व यश संपादनामध्ये आपल्या कुटुंबाचा वाटा असणार. ते आपले समर्थन करतील. आपण निर्णय घेताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. काही संशय असल्यास मित्रांचा सल्ला घ्या. पैशांच्या बाबतीत काळजी घ्या. आपल्या खर्चांवर आळा घाला. कोणतीही चुकीची गुंतवणूक ह्या वर्षी त्रासदायी होऊ शकते. हे वर्ष आपले आरोग्य सुधारेल. पण तणावापासून काळजी घ्या.

करिअर : - आपल्या करियर साठी हे वर्ष खूप चांगले आहे. आपण बरीच कामे पूर्ण करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. कामासंदर्भात परदेश गमन होईल. नोकरदारांना त्यांच्या उत्तम कारकीर्दीसाठी पुरस्कार मिळेल. तसेच आर्थिक लाभ मिळतील.
 
व्यवसाय :- आपण नवीन व्यवसाय सुरू कराल त्यात आपणास फायदा होईल. कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी जाऊ नका. व्यवसायात कोणतेही धोके पत्करू नका. व्यावसायिक भागीदारावर अती विश्वास दाखवू नका. आपले व्यवसायानिमित्त चांगले संपर्क होतील.
 
कुटुंब :- आपले कुटुंब आपणांस साहाय्य करतील. आपण कोणत्या संबंधात असल्यास कुटुंबाला प्रामाणिकपणे सांगा त्यांचे आपणास समर्थन मिळेल. त्यांना आनंद होईल. कुठल्याही प्रकाराचे गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संभाषण करा.
 
आरोग्य :- आपले आरोग्य सुधारेल. एखाद्या जुन्या त्रासांपासून सुटका होईल. खाण्यापिण्याच पथ्य पाळा. मोसमी आजारांपासून त्रास होऊ शकतो. 

प्रेम आणि वैवाहिक जीवन :- जोडीदारास पूर्ण आदर आणि प्रेम द्या. आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास भरघोस असल्यामुळे आपलं नातं बहरेल. वैवाहिक जीवनात काही संस्मरणीय गोष्टी घडतील. अविवाहित असल्यास आणि आपण प्रेमात अडकलेले असल्यास तर तुमच्या प्रेमाला कुटुंबीयांची संमती मिळेल. 
 
आर्थिक स्थिती :- आपली आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या खर्चिक प्रवृतींवर आळा घाला. नाहीतर पैशांची चणचण जाणवेल. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी जेष्ठांचा सल्ला घ्या. 

टिप :- घरातून नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नारंगी तेलाची पाण्यातून फवारणी करा. घरातील दक्षिणी बाजूस भिंतीला लाल रंग द्यावा आणि प्रसिद्धी व बढतीसाठी दक्षिणी कोपऱ्यात Victory Horse ठेवा.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments