मीन राशीसाठी, वर्ष 2020 अनेक अपेक्षांचे आणि सकारात्मक परिणामाचे वर्ष असू शकते. व्यवसायात छंदाचा उपयोग होईल. नोकरीत बढती मिळेल. पगारात वाढ होईल. ज्यामुळे आपण सकारात्मक व्हाल. नोकरीत चढ उतार येतील. व्यवसायात नवे अनुबंध होऊ शकतात. व्यवसायात सुधारणा होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळतील. कफ आणि पित्त विकाराने ग्रस्त राहाल. सर्दी पाडसाच्या वारं -वारं त्रास उद्भवू शकतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होईल. जोडीदाराशी मैत्रिपूर्वक संबंध राहतील. वर्षाच्या पूर्वार्ध पैशांची सतत आवक राहील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
करियर :- कौशल्याला विकसित करणारा कोर्स करा. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करा. त्याचा आपणांस व्यवसायाच्या दृष्टीने फायदाच होईल. नोकरीत बढतीचे योग आहे. पगारात वाढ होईल.
व्यवसाय :- आपण आपल्या छंदातून उत्पन्न मिळवाल. व्यवसायात उत्तम कारकीर्दी कराल. नवे व्यवसाय सुरू करण्यास ही चांगली वेळ आहे.
कुटुंब :- आपणांस आपल्या कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आपले कुटुंब नेहमी आपल्याला सूचना आणि कल्पना देतात. आपले त्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आपल्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
आरोग्य :- आपणांस सर्दी पाडसाचा वारं-वारं त्रास होईल. आपण खूप प्रवास करता त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम पडेल. आरोग्याची काळजी घ्या. औषधोपचार करा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास विशेष काळजी घ्या.
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- जोडीदाराशी मनमोकळे बोला. प्रेमसंबंध असल्यास आपल्या नात्यास परिवाराची स्वीकृती असेल. विवाहितांनी आपल्या जोडीदारांशी एकनिष्ठ राहा. वैवाहिक जीवनाचा हा विस्मरणीय काळ असेल. जोडीदारांशी असलेले नाते अजून घट्ट होतील.
आर्थिक स्थिती :- आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी उत्कृष्ट असणार आहे. यावर्षी चांगले उत्पन्न होईल. उत्पन्नासाठी नव्या संधी मिळतील. व्यवसायात योग्य मार्गदर्शनामुळे यावर्षी तुमचे चांगले उत्पन्न होईल. आर्थिक परिस्थिती आपल्या बाजूने आहे. आपण मुबलक उत्पन्नाच्या संधी निर्माण कराल आणि आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत कराल. योग्य मार्गदर्शनासह आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन करावे.
टिप :- घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.