Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 20 ते 26 डिसेंबर 2020

Webdunia
शनिवार, 19 डिसेंबर 2020 (16:37 IST)
मेष - पेक्षितांकडून उत्तम मदतीचा हात मिळाल्याने कामाचा वेग वाढेल. मात्र शनी - मंगळ अष्टमात आहेत तेव्हा स्पर्धा, साहस टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा व प्रकृती जपा. पराक्रमी गुरू, पंचमात शुक्र, सप्तमात रवी - बुध, भाग्यात राहू अशा छान ग्रहमानात आपल्या कर्तृत्वाला उत्तम वाव मिळेल. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांचा समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील. 
 
वृषभ - परिचित मंडळी व परिवारातील व्यक्ती यांचा उपद्रव होण्याची शक्यता असते तेव्हा सावध राहा, सतर्क राहा. चतुर्थात गुरू, षष्ठात शुक्र, अष्टमात रवी - बुध अशा प्रतिकूल ग्रहस्थितीत संयमाने वागणे, सरकारी नियम पाळणे, गुप्तता पाळणे ह्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. अशा गोष्टींनी आपण आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. वरिष्ठांशी मिळतेजुळते घ्या. 
 
मिथुन - प्रलोभने, आश्वासने यांपासून दूर राहा. आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. बौद्धिक गोष्टींचा वापर करून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारा. स्वयंसिद्ध व्हा. प्रकृतीची पथ्ये पाळा. षष्ठात गुरू, अष्टमात शुक्र, व्ययात राहू व शनी - मंगळ सहयोग अशा प्रतिकूल ग्रहमानात व्यवहाराची गणिते चुकतात व आपले अंदाजही चुकतात.  
 
कर्क - गुरू, शुक्र, रवी, बुध यांची साथ मिळाल्याने यशाचा मार्ग सुलभ होईल. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल . आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल . कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल. खर्च वाढला तरी आवकही ठीक राहील. व्ययस्थानी शनी - मंगळ आपल्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात. स्पर्धा, साहस या गोष्टींपासून दूर राहा. काही चांगल्या घटना घडतील. गणपती उत्सवाच्या काळात नवे उपक्रम सुरू करता येतील.  
 
सिंह - कायदा व अधिकार यांच्या कचाट्यात सापडू नका. विचाराने वागा. शनी साडेसाती, त्यात मंगळ, अष्टमात गुरू व व्ययस्थानी रवी - बुध अशा प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मोठ्या अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नवीन समस्या, आव्हाने यांना आमंत्रण मिळते, पण या गोष्टीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. 
 
कन्या - शनी - मंगळ सहयोगातील दूषित परिणामातून बाहेर पडण्यासाठी अथक प्रयत्नांची, हुशारीची जोड द्या. गणेशाची उपासना उपयोगी पडेल. काही महत्त्वाच्या समस्या सोडविणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळू शकेल . सामाजिक स्तर उंचावेल. चर्चासत्र, बैठकी, जनसंपर्क, व्यापारी उलाढाली या गोष्टींचा चांगला लाभ घेता येईल . 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

आरती सोमवारची

Baglamukhi Jayanti 2025: बगलामुखी जयंती तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

Bhanu Saptami 2025 : ४ मे रोजी भानु सप्तमी, सूर्य अर्घ्य आणि पूजा शुभ मुहूर्त जाणून घ्या

माँ बगलामुखी आरती Baglamukhi Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments