काही महिलांचे केस नैसर्गिकरीत्या सरळ असतात, पण ज्यांना नाही ते पार्लरमध्ये केस स्ट्रेट करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. यामुळे केस सरळ होतात, पण काही दिवसांत त्यांची नैसर्गिक चमक नष्ट होते आणि स्ट्रेटनिंगचा प्रभाव संपताच केसांचा पोत खराब होतो, तसेच केस खराब होतात. म्हणूनच केस सरळ करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, हे उपाय खूप प्रभावी आहे.
केसांवर जास्त प्रमाणात केमिकल ट्रिटमेंट केल्याने केस खराब होतात हे सौंदर्य तज्ज्ञही मान्य करतात. अशा परिस्थितीत नैसर्गिक गोष्टींचाच जास्तीत जास्त वापर करावा. असा सल्ला दिला जातो. काही जणांनी केस स्ट्रेटनीग करण्यासाठी घरगुती उपाय देखील वापरले आहेत.चला जाणून घेऊ या.
1 ऑइल मसाज ट्रीटमेंट-
केस तज्ञांच्या मते, कोमट तेलाने मसाज करून तुम्ही कुरळे केस सरळ करू शकता. खरं तर, गरम तेल केसांचा राठपणा कमी करण्यास मदत करते. मसाजसाठी तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल वापरू शकता.
मसाज कसे करावे-
मसाजसाठीसर्वप्रथम, तेल हलके गरम करा.
नंतर टाळू आणि संपूर्ण केसांना तेल लावा आणि हलक्या हातांनी 15-20 मिनिटे मसाज करा.
संपूर्ण केसांवर कंगवा करा.असं केल्याने केसांचा गुंता सुटतो आणि शॅम्पू करताना केस कमी प्रमाणात तुटतात
आता कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल केसांना बांधा. टॉवेलच्या वाफेने तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल.
अर्ध्या तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. धुतल्यानंतर केस थोडेसे ओले झाल्यावर मोठे दात असलेल्या कंगव्याने हळूवारपणे विंचरून घ्या.
2 नारळाचे दूध आणि कॉर्न स्टार्च जेल-
हे करण्यासाठी, एका भांड्यात 3 चमचे कॉर्न स्टार्च घ्या आणि त्यात 1 कप नारळाचे दूध, 4 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून चांगले मिसळा. गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत या चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळा. जेल तयार आहे.
कसे वापरायचे -
केस धुवून कोरडे करा. नंतर हे जेल टाळूवर आणि केसांच्या संपूर्ण लांबीवर लावा.
यानंतर केसांना शॉवर कॅपने झाकून त्यावर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळा आणि एक ते दीड तास तसाच ठेवा. यानंतर केस प्रथम पाण्याने धुवा नंतर सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर लावा.
फक्त एकदा वापरानंतर केसांमध्ये फरक दिसेल. तुमचे केस पूर्वीपेक्षा स्ट्रेट आणि चमकदार दिसतील. हे जेल आठवड्यातून एकदा काही दिवस वापरा असं केल्याने तुमचे केस पार्लरशिवाय स्ट्रेट होतील.
3 मुलतानी माती-
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणारी मुलतानी माती केस सरळ करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. हे नैसर्गिक स्ट्रेटनर म्हणून काम करते. हे एक नैसर्गिक क्लिंजिंग एजंट देखील आहे.
मुलतानी मातीमध्ये अंड्याचा पांढरा भाग, एक चमचा तांदळाचे पीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
हे मिश्रण केसांना वरपासून खालपर्यंत लावा. आणि नंतर मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्या.
तासाभरानंतर केसांवर दूध स्प्रे करा. त्यानंतर 15 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा.
4 ऑलिव्ह ऑइल-एग हेअर पॅक-
केस स्ट्रेट करण्यासोबतच हा उपाय केसांना चमक देखील देतो. केस तज्ञ देखील केसांच्या आरोग्यासाठी अंडी खूप फायदेशीर मानतात.
कसे वापरायचे -
एका भांड्यात दोन अंडी फोडून घ्या आणि गरजेनुसार ऑलिव्ह ऑईल टाका आणि चांगले फेणून घ्या.
हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांना लावा आणि मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरून घ्या. जेणे करून हे मिश्रण सर्व केसांना चांगल्या प्रकारे लावले जाईल.
आता कोमट पाण्यात टॉवेल बुडवून केसांना बांधा. काही वेळाने केस सौम्य शाम्पूने धुवा.
नंतर केस ओले असतानाच विंचरून घ्या.