rashifal-2026

डागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब

Webdunia
डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे.
डागरहित त्वचेसाठी
एका बाउलमध्ये मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हलक्या हाताने स्क्रब करा. याने पुरळ, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा प्रयोगात आणू शकता.

पिंपल्स दूर करण्यासाठी
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे. याने पिंपल्स नाहीसे होतील. आपण बदामाचे तेलही वापरू शकता. पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहर्‍यावर स्क्रब करावे.

टॅनिंग दूर करण्यासाठी
काळ्या मिठाचे स्क्रब चांगले परिणाम देतं. एका चमचा मधात थोडे मीठ मिसळून चेहर्‍यावर लावल्याने सन टॅनिंग दूर होईल.

स्क्रब करण्याचे नियम
स्क्रब केल्याने मृत त्वचा बाहेर पडते आणि ग्लो येतो. पण अधिक स्क्रब केल्याने त्वचेला नुकसानही होऊ शकतं. म्हणून रोज स्क्रब करू नये. आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करावे. स्क्रब नेहमी हलक्या हाताने करावे.

स्क्रबिंग करण्यापूर्वी चेहरा धुऊन टाकावा. नंतर बोटांने कपाळाहून स्क्रब सुरू करत पूर्ण चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करावी. दोन मिनिट मसाज केल्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी

Baby Naming Ceremony Gift Ideas बाळाच्या बारशासाठी सर्वोत्तम भेटवस्तू

Shri Swami Samarth Naivedya श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष नैवेद्य पाककृती

पोहे खाण्याचे फायदे जाणून घ्या, मुलांच्या आहारात समाविष्ट करा

Career in MSc Psychiatric Nursing :एमएससी सायकियाट्रिक नर्सिंग कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments