Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस लांब, दाट व चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

Benefits of onion peel for hair
कांद्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, त्याच्या पाण्याने केस धुतल्याने कोंडा दूर होतो आणि केसांना नैसर्गिक चमक व मजबूती मिळते.
कांदे चिरल्यानंतर, आपण अनेकदा त्यांची सालं कचरा समजून फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की हीच सालं तुमच्या केसांसाठी एक वरदान आहेत? होय, कांद्याच्या सालींमध्ये खुद्द कांद्यापेक्षाही जास्त अँटीऑक्सिडंट्स, सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि जीवनसत्त्वे ए, सी, आणि ई असतात, जे केसांच्या प्रत्येक समस्येवर उपाय ठरू शकतात.
जर तुम्हाला केस गळणे, केस पांढरे होणे, कोंडा किंवा केस विरळ होण्याचा त्रास होत असेल, तर कांद्याच्या सालीचे हे सोपे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
 

१. हेअर रिन्स वॉटरने केसांना चमक आणा

दोन ग्लास पाण्यात दोन मूठभर कांद्याची साले मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उकळा, जोपर्यंत पाण्याचा रंग गडद तपकिरी होत नाही. गाळून थंड करा. शॅम्पू लावल्यानंतर, याच पाण्याने केस स्वच्छ धुवा आणि पाच मिनिटे टाळूची मालिश करा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे कोंडा नाहीसा होईल आणि केसांना चमकदार चमक येईल.
२. दाट केसांसाठी जादुई तेल
एका कप खोबरेल किंवा तिळाच्या तेलात मूठभर सुक्या कांद्याची साले घाला आणि मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे, साले काळी होईपर्यंत शिजवा. तेल थंड करून गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत साठवून ठेवा. आठवड्यातून दोनदा या तेलाने मालिश करा आणि दोन तासांनंतर शॅम्पू लावा. हे तेल केसांची मुळे मजबूत करते आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
 

३. पांढऱ्या केसांसाठी नैसर्गिक रंग

एका लोखंडी तव्यावर तेल न घालता कांद्याची साले जाळून त्यांची राख करा. ही राख वाटून त्याची पूड करा आणि त्यात एक चमचा कोरफडीचा गर किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट पांढऱ्या केसांना लावा आणि एका तासानंतर धुवून टाका. रसायनांशिवाय केस काळे करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

४. कोंड्यासाठी हेअर पॅक

कांद्याची साले सुकवून त्याची पूड करा. या पुडीमध्ये दोन चमचे, दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण ३० मिनिटे तुमच्या टाळूवर लावा आणि नंतर हर्बल शाम्पूने धुवा. खाज आणि कोंडा नाहीसा होईल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी