Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केसांच्या आरोग्यासाठी कापूर

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:42 IST)
कापराच्या ज्वलनाने वातावरणात एक प्रकारचा सुगंध पसरतो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांचे आरोग्य राखताना कापराचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो.
 
कापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात कापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्या टाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे. 
 
कापराच्या तेलाने १५ ते २0 मिनिटे डोक्याला मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. या मसाजनंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल केसांभोवती लपेटावा अथवा केसांवर गरम वाफ घ्यावी. यामुळे तेल केसात मुरण्यास मदत होते. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवून टाकावेत. कापराची अँलर्जी असू शकते म्हणूनच वापर करण्याआधी चाचणी घ्यावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

कोणत्या प्रकारची भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत

फसवणूक करणाऱ्याच्या वागण्यात या 4 गोष्टी दिसतात

सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस प्या, 5 जबरदस्त आरोग्य फायदे मिळतील

Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पोषकतत्वांनी भरपूर मुगाचा ढोकळा रेसिपी

पुढील लेख
Show comments