Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर
, बुधवार, 2 डिसेंबर 2020 (13:21 IST)
प्रत्येक घरात थंड हवामानात हंगामी अन्न घेणं सगळ्यांनाच आवडतं. त्या मधील व्हिटॅमिन सी हिवाळ्याच्या हंगामात आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. जर का आपण असा विचार करत आहात की मोसंबी केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर आपण चुकीचा विचार करीत आहात. 
 
वास्तविक, यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतं. जे आपल्या त्वचेला आणि केसांना निरोगी ठेवण्यात मदत करतं. आज आम्ही आपल्याला मोसंबीच्या रसाने मिळणाऱ्या काही फायद्यांबद्दल सांगत आहोत. 
 
* केसांना मजबूत करा - 
केसांचे तज्ज्ञ सांगतात की मोसंबीच्या रसाचे नियमित सेवन केल्यानं आपले केस मजबूत होण्यास मदत मिळते. या शिवाय हे केसांना  तुटण्याच्या समस्यांपासून दूर ठेवतं. रस व्हिटॅमिनसी ने समृद्ध असल्याने मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि केसांना मुळापासून टीपांपर्यंत मजबूत ठेवण्यास मदत होते. केसांचे खोल पोषण देखील आपल्या केसांची वाढ करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात.
 
* कोंड्यापासून सुटका -
केसांच्या तज्ज्ञांच्या मते, टाळू किंवा स्कॅल्प स्वच्छ असेल तरच केस निरोगी असतात. खाज येणं किंवा कोरडी टाळू कोंड्याला कारणीभूत ठरतात. या मुळे आपण सतत आपले डोकं खाजवता. हे रोखण्यासाठी आपण नियमानं मोसंबीचा रस प्यावा किंवा मोसंबीच्या रसाला आपण शॅम्पू केल्यावर हेअर वॉशच्या रूपात देखील उपयोगात आणू शकता. वेळोवेळी आपण असे केले तर आपण बघाल की आपल्या टाळूला आद्रता जाणवेल आणि कोंडा आणि खाज नाहीशी होईल.
 
* इरिटेशन पासून सुटका - 
कधी-कधी असे होतं की आपली टाळू संवेदनशील बनते आणि त्या वेळी मुळांना हात लावल्यावर वेदना जाणवते. अशा परिस्थितीत मोसंबी वापरणे एक चांगली कल्पना आहे. या मध्ये व्हिटॅमिन सी असतं, जी टाळूच्या वेदना आणि जळजळ दूर होण्यापासून मदत करतं. एवढेच नव्हे तर, हे दोन तोंडी केसांचा उपचार देखील करू शकतं.

* असे वापरावं - 
जर आपल्याला असं वाटत असेल की मोसंबी ने आपल्या केसांना फायदा मिळावा, तर या साठी आपण ही दोन प्रकारे वापरण्यात घेऊ शकता. प्रथम हे आपल्या आहारात समाविष्ट करून आणि दुसरं याने आपले हेयर वॉश करून. हेयर वॉश बनविण्यासाठी मोसंबीला सोलून त्याचे रस काढून घ्या. आता एका भांड्यात पाणी गरम करा आणि गॅस बंद करून द्या. या पाण्या मध्ये रस मिसळा आणि हलवा. शॅम्पू केल्यावर आपल्या केसांना धुऊन घ्या. आपल्याला त्वरितच परिणाम मिळतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंबट द्राक्षे : कोल्ह्याची मजेदार गोष्ट