suvichar
✕

Coffee Face Pack डागरहित आणि चमकदार त्वचा मिळवा या सोप्या पद्धतीने

Webdunia
क्वचितच कोणी असेल ज्याला चमकणारी त्वचा हवीहवीशी वाटत नसेल. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव होतो. अशा परिस्थितीत या थंडीच्या मोसमात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य अन्न खाणे देखील खूप महत्वाचे आहे. अनेक वेळा बाजारात उपलब्ध असलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला घरच्या घरी कॉफी फेस पॅकबद्दल सांगणार आहोत. हे मुरुम काढून टाकण्यास मदत करते आणि डागरहित आणि चमकदार त्वचा देण्यास मदत करतं. चला तर मग जाणून घेऊया कॉफी फेस पॅक बनवण्याच्या पद्धत आणि फायदे-
 
कॉफी फेस पॅक बनवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत-
कॉफी पावडर - 1 टीस्पून
मध - 1 टीस्पून
दूध - 1 टीस्पून
हळद पावडर - 1 चिमूटभर
 
कॉफी फेस पॅक कसा बनवायचा-
कॉफी फेस पॅक बनवण्यासाठी आधी कॉफी, मध, दूध आणि हळद पावडर मिक्स करा. ते चांगले मिसळा. यानंतर, हलक्या हातांनी किंवा ब्रशने चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. दोनदा लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसू लागेल.
 
कॉफी फेस पॅक लावण्याचे फायदे-
कॉफी फेस पॅक त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहे. हे सुरकुत्या, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करते.
 
हळद चेहऱ्यावरील मुरुम आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते आणि चेहरा सुधारण्यास मदत करते.
 
असे अनेक पोषक घटक मधामध्ये आढळतात, जे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यास मदत करतात.
 
दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, बी6, डी, बी12 आणि कॅल्शियम त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments