Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक
घरात अगदी सहज सापडणारी काकडी चेहर्‍यावर चमक आणू शकते. घरी काकडीचे फेस पॅक तयार करून आपण ही दिसू शकता सुंदर. तर जाणून घ्या कसे तयार करायचे आहे हे पॅक: 
 
* अर्धी काकडी घेऊन 1-1 चमचा ओट्स, दही आणि मधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या. 
 
* काकडीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस आणि अंड्याच्या पांढरा भाग मिसळा. 20 मिनिट ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल. 
 
* 5 चमचे काकडीच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचे रस मिसळा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. 
 
* 3 चमचे काकडीच्या रसात 12 थेंब गुलाबपाणी आणि थोडी मुलतानी माती मिसळा. 14 मिनिट त्वचेवर लावून ठेवावे नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्सही नाहीसे होतात.
webdunia

* 1 चमचा एलोवेरा जेल किंवा रसात किसलेली काकडी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल. 
 
* 2 चमचे बेसनामध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग दूर होतील. 
 
* काकडीच्या पेस्टमध्ये दही मिसळा. चेहर्‍यावर या मिश्रणाने मालीश करा. 10-15 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन टाका. हे ड्राय स्कीनवर उपयोगी ठरेल. तसेच पिंपल्सची समस्याही सुटेल. 
 
* काकडी आणि ओट्सची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावून 15 मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. डेड स्कीनसाठी हे फायदेशीर ठरेल.
 
* काकडी आणि टोमॅटो मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटाने गार पाण्याने धुऊन टाका. याने त्वचा उजळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुके गुलाबजाम