Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डार्क कॉम्प्लेक्शनचे फायदे

डार्क कॉम्प्लेक्शनचे फायदे
, गुरूवार, 2 मार्च 2023 (20:02 IST)
अधिकश्या गव्हाळ रंगाच्या लोकांकडे हीनदृष्ट्या बघितलं जातं. परंतू डार्क कॉम्प्लेक्शन असलं तरी वाईट मानायची गरज नाही कारण येथे आम्ही सांगत आहोत की डार्क स्कीनचेही काही फायदे:
उन्हाने होतो बचाव
डार्क स्कीनमध्ये मेलानि‍नची मात्रा अधिक असते. जी सूर्याच्या धोकादायक अल्ट्रा-व्हायलट किरणांपासून आपल्या त्वचेचा बचाव करते. म्हणून डार्क त्वचा असणार्‍यांना उन्हापासून भीती नाही.
 
त्वचेच्या कॅन्सरचा धोका नाही
जर आपली त्वचा डार्क असेल तर त्यात आढळणारे डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचा कर्करोगी होण्याचा धोका नसतो तसेच उजळ रंग असणार्‍यांना हा धोका असू शकतो.
 
मज्जासंस्थेला देतं सुरक्षा
त्वचेत आढळणारे मेलानिन सेंट्रल नर्वस सिस्टमला नुकसान पोहचवणार्‍या परजीवींपासून बचाव करतात.
 
तारुण्य प्रदान करतं
गव्हाळ रंग यंग लुक देतं. डार्क स्कीनमध्ये आढळणारे मेलानिन त्वचेला अधिक काळपर्यंत सुरकुत्या पडण्यापासून वाचवतं. ज्यामुळे आपण तरुण दिसता.
 
रोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर
आपली डार्क त्वचा आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते. कारण मेलानि‍नमुळे आपल्या शरीरातील रोग पार्टीकारक क्षमता वाढते. याने सर्दी, खोकला, ज्वर यापासून बचाव होतो.
 
गर्भधारणेत मदत होते
डार्क त्वचा गर्भधारणेत मदत करतं हे ऐकून आश्चर्य वाटत असेल पण यात आढळणारे मेलानि‍न हेल्दी एग प्रोडक्शनमध्ये मदत करतं आणि गर्भावस्था अनेक रोगांपासूनही बचाव करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

7 दिवसात कमी करा पोटाची चरबी